महाराष्ट्र

लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून जर तुम्हीही लाल परीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. खरंतर राज्यात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे.

एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात. राज्य सरकार देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध सवलतीच्या योजना राबवत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना एसटीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जात आहे. यासोबतच विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील सशुल्क तसेच मोफत पास सारखी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून राज्यातील महिलांना एसटीच्या प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. म्हणजे महिलांना एसटीने अर्ध्या भाड्यात प्रवास करता येणे शक्य आहे. दुसरीकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एसटीच्या प्रवासात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येणे शक्य झाले आहे. अशातच आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

या लोकांनाही मिळणार विशेष सवलत

मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील पत्रकारांसाठी सध्या लागू असणाऱ्या सवलतीच्या योजनेत मोठा बदल होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी असे सांगितले आहे की, सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसेस मध्ये मोफत प्रवासाची सवलत मिळत आहे.

पण या सवलतीवर 8 हजार किलोमीटरची मर्यादा घालून देण्यात आली आहे. दरम्यान, आता ही मर्यादा रद्द करण्यात येणार आहे. पत्रकारांना लागू असणाऱ्या सवलतीसाठी जी 8000 km ची अट आहे ती अट रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केली जात असून या मागणीवर आता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली आहे.

एवढेच नाही तर राज्यातील पत्रकारांना सर्वच प्रकाराच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असून यामुळे पत्रकारांना ग्रामीण भागात देखील एसटी बसने जाता येणे शक्य होणार आहे आणि यामुळे पत्रकारांना आपले कर्तव्य बजावताना सहकार्य मिळणार आहे.

दुसरीकडे पत्रकारांना ऑनलाईन रिझर्वेशन करण्याची देखील सुविधा उपलब्ध नाहीये पण लवकरच ही देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले आहे. ऑनलाइन रिझर्वेशनची ही सुविधा पुढील महिन्यापासूनच लागू होण्याची शक्यता आहे. परंतु या निर्णयाचा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच लाभ होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

4 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

4 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

20 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

20 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

20 तास ago