संभाजीनगर: वैजापूर तालुका शिऊर गाव, छ. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार नावाचा भोंदू बाबा अनेक महिन्यांपासून लोकांची फसवणूक करत होता.
लग्न होत नाही, मूल होत नाही, भूतबाधा झाली आहे, अशा थापा मारून बाबा लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा. मंदिरात ढोलकी, मंत्रजाप आणि “अलख निरंजन” च्या आरोळ्या देत तो अघोरी कृत्य करत असे, त्याने काही लोकांच्या मानेवर पाय ठेवणे, पोटावर काठी ठेवणे, तोंडात लघवी करणे, नाकाला बूट लावणे असे क्रूर प्रकार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी घेतली गंभीर दखल
17 जुलै 2025 रोजी तक्रारदार किशोर शांताराम आघाडे यांच्या फिर्यादीवरून, वैजापूर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे. सध्या तपास सुरू असून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
भोंदू बाबांवर कठोर कारवाई का गरजेची आहे
अनेकदा अशिक्षित किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे लोक अशा फसवणुकीला बळी पडतात. त्यांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान होत. त्यामुळे संपूर्ण राज्यात अशा फसव्या भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाई ही काळाची गरज आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…