महाराष्ट्र

गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची; अनंत गाडगीळ

मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधान कारक यासारखी विशेषण लावत झाल्याचे परराष्ट्र खात्यापासून ते भारतातील मोदी सरकार धार्जिण्या प्रसार माध्यमातून सर्वत्र सांगितले जात होते. त्यातच “मोदी, माय फ्रेंड, इज ए ग्रेट नेगोशिएटर” (मोदी व्यवहारिक वाटाघाटीत तरबेज आहेत) असे म्हणणारा ट्रम्प यांचा व्हिडियो सोशल मीडियावर गेले काही दिवस झळकत होता पण घडले मात्र उलटे. ट्रम्प यांचे ते वक्तव्य गुगलीच ठरले, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते मा. आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.

भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या मालावर ट्रम्प यांनी तब्ब्ल २७% करभार जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी भारताला जगातील इतर १३८ देशांच्या यादीत बसविले. भारतासाठी हा केवळ धक्काच नव्हे तर अपमानही आहे. भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या मालाची सरासरी उलाढाल हि कमी जास्त पद्धतीत अंदाजे ११ हजार कोटींच्या (९५ बिलियन डॉलर्स) पुढे आहे. याउलट अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या मालाची उलाढाल ही ४ हजार कोटींच्या जवळपास गेली आहे. इंजिनियरिंग क्षेत्रातील भारताची निर्यात अंदाजे ७ हजार कोटी, दागिने ५ हजार कोटी, पेट्रोलियम ५ हजार कोटी, यासारख्या असंख्य क्षेत्रातील निर्यातीवर विपरीत परिणाम होणार आहे. या आकडेवारीवरून नुकसान भारताचेच अधिक आहे हे स्पष्ट होत आहे.

ट्रम्प यांच्या या निर्णयाचे प्रामुख्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहेत अशी भीती विविध अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत. पण विशेष करून आयटी क्षेत्रातील सुशिक्षित बेकारी तर वाहन क्षेत्रातील कामगार वर्गात बेकारी वाढणार आहे. मोदी सरकारला ट्रम्प यांच्यावर इतका भरवसा होता कि या प्रश्नावर विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन चर्चा करण्याचे तारतम्य सुद्धा मोदी सरकारने दाखविले नाही असे गाडगीळ यांनी म्हंटले आहे. ट्रम्प यांच्यावर विश्वास टाकत गाफील राहिलेल्या मोदी सरकारची, ट्रम्प यांनी गुगली टाकत जणू विकेटच घेतली आहे अशी खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

39 मिनिटे ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

22 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago