महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयासाठी 15 एकर भूसंपादनाचा शासननिर्णय निर्गमित

पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आयुक्तालयासाठी 15 एकर जागेचे भूसंपादन महत्वाचे ठरणार

मुंबई: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ 2 सह, इतर अनुषंगिक कार्यालये तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी वाकड येथे 15 एकर जागेच्या भूसंपादनास राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे अल्पावधीतंच हा प्रश्न मार्गी लागला असून त्यासंबंधीचा शासननिर्णय आज निर्गमित झाला. या निर्णयामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्याबरोबरंच पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण, देशभरातील स्थलांतरीतांमुळे वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे पोलिस यंत्रणेवर वाढणारा ताण लक्षात घेऊन पोलिस दलाचे सक्षमीकरण आवश्यक होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीने लक्ष घालून पोलिस दलाच्या मजबुतीकरणासाठी अनेक निर्णय घेतले. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ 2 सह, इतर अनुषंगिक कार्यालये तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी वाकड येथे 15 एकर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे आला. त्या प्रस्तावास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता आज मिळाली आणि त्यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित झाला. यातून पोलिसदलाला अनेक सुविधा मिळणार असून पोलिस दलाच्या सक्षमीकरणास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती करुन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवडला आजचे विकसित शहराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शहराच्या विकासासबरोबरंच शहरातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या बळकटीकरणाचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण होण्यासाठी जातीने लक्ष घातले. त्यासाठी मंत्रालयात बैठका घेतल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने पीएमआरडीएकडे (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) वाकड येथे जागा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार, वाकड येथील सर्व्हे नं. 208 आणि 209 मधील 15 एकर जागा, वाणिज्यिक दराने अधिमुल्य रकमेचा भरणा करुन पोलिस विभागासाठी भूसंपादन करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी आवश्यक सुविधा निर्माण होतील. पोलिसांची कार्यक्षमता वाढेल आणि गुन्हेगारी नियंत्रणास मदत होईल. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसाठी उत्तम निवासव्यवस्था उपलब्ध होईल. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

1 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

4 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

4 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

7 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago