मुख्य बातम्या

सरकारने ‘किल्ले रायगड’ प्रमाणे गड-किल्ले संवर्धन करावेत; युवराज संभाजी राजे छत्रपती

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): सरकारने श्रीमान किल्ले रायगड मॉडेल प्रमाणे गड-किल्ले संवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत असे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केले.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे तिथी नुसार असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी युवराज संभाजीराजे छत्रपतींनी मी किती जणांची नावे घ्यायची अशी मागणी केली असता आमची कुणाची ही नावे घेऊ नका फक्त ‘समस्त ग्रामस्थ रांजणगाव’ चा उल्लेख करा असे सांगितले. हे मी पहिल्यांदाच असे चित्र पाहिले असल्याचे गौरवउद्गार छत्रपती यांनी काढले .

श्री शिवशाही प्रतिष्ठानच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित शिल्पाची उभारणी करण्यात आली. यावेळी किरण वळसे पाटील, शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य कविता खेडकर, माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा डॉ .एकनाथ खेडकर ,सरपंच सुवर्णा वायदंडे, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शुभस्य डेकोरेटरचे आकाश साळुंखे यांनी संपुर्ण सजावट व इतर जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली कार्यक्रमात शाहीर सानप सातारा यांच्या पोवाड्याने रंगत आणली.

यावेळी माजी सरपंच सर्जेराव खेडकर, राहूल पवार, महेश फंड, दत्तात्रय पाचुंदकर,नारायण पाचुंदकर, दयानंद फंड, प्रताप फंड, ओमकार देव वैभव खेडकर यांच्यासह व्यासपीठावर गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा माणिक खेडकर व सुत्रसंचालन रोहिदास खेडकर व आभार अजय गलांडे यांनी मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भानुदास शेळके, नेताजी फंड, नितीन लांडे, अनिल शेळके, सतीश वाघुले, सतीश क्षिरसागर, शिवशाही प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, निर्मलग्राम ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ रांजणगाव गणपती व आजी-माजी पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

22 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago