महाराष्ट्र

मुसळधार पावसाने संरक्षण भिंत कोसळली; संबंधित यंत्रणांना बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश…

मुंबई: मुंबईत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षक भिंत कोसळून घरांचे नुकसान झाले मात्र जिवितहानी झालेली नाही. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली

दरम्यान या घटनेनंतर अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेली बंद दोन घरे संरक्षण भिंतीसह खाली कोसळली त्यामुळे भिंतीच्या खालील बाजूस असलेल्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बाधित कुटुंबांसाठी तात्पुरते पुनर्वसन व मूलभूत सुविधांची व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एम-पूर्व वॉर्ड देखभाल विभागाशीही आमदार सना मलिक – शेख यांनी संपर्क साधून अग्निशमन दल तसेच आरसीएफ पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ भिंत कोसळलेल्या ठिकाणी बोलावले.

रविवारीच घटनास्थळाचा आरसीएफ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून या घटनेनंतर आमदार सना मलिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण टीम मदतकार्यास तैनात ठेवली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

5 मिनिटे ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago