आरोग्य

अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्याने बरे होतात. हे तेल पहाटे घेणं फायदेशीर ठरतं. या तेलाचा ओशटपणा, ढेकर येणं हे त्रास टाळण्याकरिता ते सकाळी लवकर अनशापोटी घेतल्यास फायदा होतो.

एरंडेल तेलामुळे वारंवार पोट फुगणे, गच्च झाल्या सारखं वाटणे, पोट साफ न होणे या समस्या दूर होतात. हे तेल शरद आणि वसंत ऋतूत घ्यावे. वसंत ऋतुत उष्णता वाढलेली असते. यामुळे ऋतुनुसार शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि प्रकृतीत होणारे त्रास टाळण्यासाठी एरंडेल तेल प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. पोट साफ होण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या चुर्णांचा वापर करतात. यावर एरंडेल तेल प्यायल्यास फायदेशीर ठरते. कोठा साफ होण्याकरिता वर्षातून दोन वेळा तरी शरद आणि वसंत ऋतुत एरंडेल तेल प्यावे.

कसं घ्याल

सकाळी रिकाम्या पोटी एरंडेल तेल प्यायल्यास शरीराला लागू पडतं. एरंडेल तेल पिताना पोट थोडं रिकामं ठेवावं. भरपेट खाल्ल्यानंतर एरंडेल तेल घेऊ नये. प्रौढांची मात्रा वय वर्षे २० ते ८० वर्षा पर्यंत ३० मिली घ्यावे. रात्रीच्या वेळी शक्यतो अत्यंत कमी किंवा हलका आहार घ्यावा. गरम पाणी, गरम चहा किंवा गरम पेजेतून एरंडेल घेऊ शकता किंवा लिंबू पाणी, ताक यातूनही घेतलं तरी चालतं. हे तेल प्यायल्या नंतर तेलाच्या ओशटपणाचा तोंडाला आलेला त्रास जाण्यासाठी कोकम किंवा आमसूल घ्यायला हरकत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago