महाराष्ट्र

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभरात प्रभावीपणे राबवणार

मुंबई: शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटीची सर्व बसस्थानके “हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभिनयाच्या माध्यमातून सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु! अर्थात , हे अभियान केवळ एसटीचे नसून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रवाशांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ती एक ” लोकचळवळ ” करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते कुर्ला बसस्थानक येथे स्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर “हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, आपण आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणेच आपण जिथे काम करतो, तेथे देखील आपले घर समजून त्या कार्यालयाची, त्या बसस्थानकाची स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यात स्वच्छ, सुंदर, सुशोभित बसस्थानके नक्कीच प्रवाशांना आकर्षित करतील. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये बस प्रवास करण्याचा आनंद त्यांना लुटता येईल. अर्थात, स्वच्छता हा एक “संस्कार” आहे, तो जसा एसटी कर्मचाऱ्यांनी अंगिकारणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर प्रवाशांनी देखील तो आपल्या आचरणात आणला पाहिजे! बसस्थानक हि सार्वजनिक जागा आहे. तिथे स्वच्छता ठेवणे ही एसटी कर्मचारी आणि प्रवासी या दोघांची संयुक्त जबाबदारी आहे.

स्वच्छतेबाबत परदेशात जेवढी सजगता आणि जागरूकता आहे, तेवढी आपल्या देशात नाही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण स्वच्छतेच्या बाबतीत लोकांच्यात जनजागृती करून आपली बस स्थानके स्वच्छ आणि सुंदर कशी राहतील यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचा आहे .या स्पर्धात्मक अभियानातून एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मध्ये आपले बसस्थानक स्वच्छ, सुंदर व टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या माध्यमातून भविष्यात चांगली सुंदर बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली. यावेळी एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख यांनी प्रास्ताविक केले, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी अभियानाची रुपरेषा मांडली, तर उपमहाव्यवस्थापक जयेश बामणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला एसटीचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी 

मा.मंत्री परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

11 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

17 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

17 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

17 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

17 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago