पाबळ (सुनिल जिते): शिरुर, जुन्नरसह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत बिबट्याच्या उपद्रवाचे आणि मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, प्रशासन पातळीवर मात्र पुरेसे गांभीर्य नसल्याचेच दिसत आहे. वनविभागाच्या तोकड्या उपाययोजनांपुढे बिबट्या भारी ठरत असताना आणि गेल्या दोन वर्षांत आठजणांना जीव गमवावा लागला असताना शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार मात्र गेल्या तीन महिन्यांपासून प्रभारीच्या जीवावरच बेतला असल्याचे चित्र आहे. जुन्नर वनविभागांतर्गतही बिबट्याची समस्या आ वासून उभी असताना कामातील सुसूत्रतेबाबत सावळा गोंधळ दिसून येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षांत दहा जणांना जीव गमवावे लागले आहेत. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील गारकोलवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी झाल्याची घटना आज (दि. २३) रोजी पहाटे गारकोलवाडी शिवारात उघडकीस आली.तालुक्यातील गारकोलवाडी येथील शेतकरी आनंदा शिंदे यांची शेती आहे. या शेतात त्यांनी पशुधनासाठी गोठा तयार केला आहे. या जाळीत त्यांनी शेळ्या व गाय वासरू ठेवल्या होत्या. शेतकरी शिंदे यांनी बुधवारी (दि. २२ ) सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास दरवाजा बंद करून व शेतातून घरी परत गेले.
दरम्यान, सकाळी ५ च्या सुमारास बिबट्याने जाळीच्या आत प्रवेश करून हल्ला चढवला. यावेळी बिबट्याने १ वासरू व दोन शेळ्याचा फडशा पाडला.शेतकरी आनंदा शिंदे यांचा मुलगा प्रतिक शिंदे सकाळी सात वाजताच्या सुमारास शेतात गेले असता, सदर प्रकार उघडकीस आला. वासरू व शेळी नसल्याने त्यांनी जवळील असलेल्या मकेत पाहणी साठी गेला असता. बिबट्या तिथेच असल्याने प्रतिक शिंदे यांच्यावर बिबट्यानी हल्ला चढवला व त्यात प्रतिक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहिती मिळताच वनरक्षक गणेश पवार,हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
डरकाळ्यांनी धास्तावलेले ग्रामस्थ; मात्र प्रशासन सुस्त
१) शिरूर कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारीपद रिक्त
२) शिरूर वनपरिमंडळात तीन, शिक्रापूर चार आणि पिंपरखेड वनपरिमंडळाच्या नियतक्षेत्रात दोन असे नऊ वनरक्षक का
३) त्यांच्यावरील नियंत्रणासाठी तीन परिमंडळात तीन वनपाल.
4) बिबट उपाययोजनां बरोबरच त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्याहअसल्याने बिबटे उदंड झाल्याचे भयावह चित्र
५) गेल्या काही महिन्यांत बिबट्यांची संख्या वाढली असून, त्यांचे
जनावरांसह मानवांवरील हल्ल्यात वाढ
बिबट्यांच्या दहशतीमुळे रात्रीची शेतीची कामे तर बंदच झाली आहेत. पण आता दिवसादेखील बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. बिबट्या दिसल्यास वनखात्याला कळवावे म्हटले तरी कुणीही तातडीने फोन उचलत नाही, योग्य प्रतिसाद देत नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. दुसऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक देऊन जबाबदारी ढकलून लावली जात आहे, असे शेतकरी संतोष शिंदे यांनी सांगितले.
सध्या बिबटे जास्त आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे कमी अशी विरोधाभास आहे. त्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. एक बिबट्या पकडला तरी दुसऱ्या बिबट्याचे भय काही संपत नाही. तसेच बिबट्याचा माणसांवर हल्ला करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. एकंदरीत यावर शासनाने प्रभावी मार्ग काढून शेतकऱ्यांना भयमुक्त करणे गरजेचे आहे, असे अमोल पुंडे यांनी सांगितले.
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…