डबडबलेल्या डोळ्यांनी सुनील तटकरे यांनी दादांच्या केबिनमध्ये जाऊन अभिवादन केले
मुंबई: दादांनी ज्या कार्यालयात पक्षाचे संघटन उभे केले तिथे नतमस्तक व्हावे या भावनेतून आज पक्ष कार्यालयात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली.
आज कोणतीही पत्रकार परिषद आयोजित केलेली नाही याचा खुलासा पहिल्यांदा सुनील तटकरे यांनी केला. दादांचा अकाली जाण्याचा धक्का आम्हाला बसला असून या धक्क्यातून आम्ही कुणीही सावरलेलो नाही. अजुनही दादा आमच्यात आहेत ही भावना आमच्या मनात आहे. आज कार्यालयात आलो हे माझ्यासाठी क्लेशकारक आहे. याव्यतिरिक्त मला काही बोलायचे नाही असेही सुनील तटकरे यांनी गहिवरलेल्या स्वरात माध्यमांना सांगितले.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली कारण जनतेच्या मनातील आणि आमच्या मनातील भावना व्यक्त केल्या. दादांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र घडवला आज त्यांच्या निधनाने राज्य शोकसागरात आहे. दोन दिवस सर्व मिडियामध्ये दादांचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. त्याच शोकाकुल वातावरणात आम्ही आहोत. इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही असेही सुनील तटकरे म्हणाले.
आज पक्ष कार्यालयात आल्यावर खासदार सुनील तटकरे यांनी दादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दादा पक्ष कार्यालयात ज्या केबिनमध्ये बसून कारभार करत होते तिथे जाऊन डबडबलेल्या डोळ्यांनी अभिवादन केले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …