महाराष्ट्र

लेकीच्या जन्मानंतर मिळतात ५०,००० रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की आहे तरी काय

मुंबई: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना आर्थिक मदत मिळते. मुलींच्या जन्माचे दर वाढवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना एकरकमी ५०,००० रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी पैसे दिले जातात. या योजनेत गरीब कुटुंबातील मुलींना योजनेचा लाभ घेता येणार आहे.१ एप्रिल २०१६ रोजी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

वीकीपीडियानुसार,ज्या कुटुंबाचे उत्पन्न ७.५ लाखांपर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याआधी फक्त उत्पन्न १ लाख रुपये असेल तरच लाभ मिळत होता. परंतु आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनेत मुलीच्या जन्मानंतर जर आईवडिलांनी परिवार नियोजन केले तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलीच्या कुटुंबाच्या नावावर ५०,००० रुपये जमा केले जाणार आहेत.या योजनेत मुलींच्या नावावर १ लाखांचा अपघात विमा मिळणार आहे. या योजनेत एका कुटुंबातील फक्त २ मुलींनाच मदत मिळणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या योजनेत मुलीच्या जन्मानंतर दरवर्षी अजून काही लाभ दिले जातात. या योजनेत मुलीच्या उच्च शिक्षणासाठीही मदत केली जाते. माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६००० रुपये, सहावीत गेल्यावर ७००० रुपये आणि अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५००० रुपये दिले जातात.या योजनेत एकूण १ लाख १ हजार रुपये दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना पैसे मिळाला. मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या सरकारने राबवली आहे

माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. २०१६ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी उत्पन्नाची पात्रता काय आहे

माझी कन्या भाग्यश्री योजनेत त्याच मुलींना लाभ मिळणार आहे ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न ७.५ लाखांपेक्षा कमी असेल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अट काय

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत किती पैसे मिळतात

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये मिळतात. याचसोबत इतर अनेक लाभ मिळतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

2 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

10 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

10 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

10 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

10 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

11 तास ago