महाराष्ट्र

गणेशोत्सवात सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी बंधनकारक

मुंबई: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक मूळ गावी जातात. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी देण्यात येणार आहे. या काळात कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. युवासेना आणि शिवसेनेच्यावतीने यासंदर्भात करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे.

राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जोरात साजरा करण्यात येणार आहे. पण अनेक शाळा या काळात सुट्टी देत नाहीत. परीक्षाही घेतल्या जातात. त्यामुळे शिवसेना नेते, आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सहसचिव परशुराम तपासे व संतोष धोत्रे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश पंकाळ यांना पत्र पाठवले होते. राज्यात गणेशोत्सव, दिवाळी व अन्य धार्मिक सण उत्सवाच्या काळात शाळांना अल्प मुदतीच्या विशेष सुट्टय़ा जाहीर करण्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे. उत्सवाच्या काळात शाळांनी कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत, असे आदेश जारी केले आहेत. पण तरीही अनेक शाळा या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत नाहीत.

गणेशोत्सव काळात पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मूळ गावी जातात. त्यामुळे नियमित शालेय उपस्थिती व शैक्षणिक कामाकाजावर परिणाम होते. त्यामुळे गणेशोत्सवात पाच दिवसांची सुट्टी जाहीर करावी तसेच सीबीएससी, आयसीएससी, आयबी अशा अन्य बोर्डाच्या शाळांत सुट्टीच्या संदर्भातील आदेशाचे पालन करणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात केली आहे.

युवासेना आणि शिवसेनेची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. महापालिका शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांनी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांना पत्र पाठवले आहे. पालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच इतर बोर्डाच्या खासगी प्राथमिक शाळांनी गणेशोत्साच्या सुट्टीमध्ये परीक्षांचे आयोजन करू नये असे पत्रकात नमूद केले आहे.

आज नारळी पौर्णिमेची सुट्टी; दहीहंडी, अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द

राज्य सरकारने 2025 या वर्षात जाहीर केलेल्या गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या शासकीय सुट्टीत बदल केले आहेत. त्यानुसार या सुट्टय़ांऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी असणार आहे. ही स्थानिक सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू असेल. त्यामुळे आजपासून तीन दिवस मुंबईतील शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

1 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

3 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

3 तास ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

4 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

4 तास ago

काळ्या जादूने माजी सरपंचांच्या खुनाचा कट? झाडावर फोटो टांगून अघोरी पूजा; मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा…

4 तास ago