महाराष्ट्र

अमेरिका–इराण युद्धाचा भारतावर परिणाम; गॅस महागला, उद्योग ठप्प, स्मशानभूमीही बंद

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या US–Iran conflict चा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. या संकटाचा परिणाम केवळ स्वयंपाकाच्या गॅसपुरता मर्यादित न राहता उद्योग, बाजारपेठ आणि अगदी स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव; गॅस आयात प्रभावित

भारताला लागणाऱ्या एकूण नैसर्गिक व इंधन गॅसपैकी सुमारे 60 टक्के गॅस परदेशातून आयात केला जातो. हा गॅस मोठ्या टँकर जहाजांद्वारे समुद्रमार्गे भारतात आणला जातो. मात्र १ मार्चपासून स्ट्राईट ऑफ हॉरमुझ परिसरातील वाढत्या तणावामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. हा मार्ग जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो.

फ्यूल गॅस म्हणजे काय?

फ्यूल गॅस म्हणजे इंधन म्हणून वापरला जाणारा गॅस. यात एलपीजी, एलएनजी, सीएनजी आणि पीएनजी अशा विविध प्रकारांचा समावेश होतो. स्वयंपाक, उद्योग, वाहन, वीज निर्मिती तसेच शहरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठ्यासाठी या गॅसचा वापर केला जातो. भारतात काही प्रमाणात उत्पादन होत असले तरी देशाची मोठी गरज आयातीवर अवलंबून आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती 110 डॉलर पार

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून दर 110 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतावर दिसू लागलेले परिणाम

1) गुजरातमध्ये 100 कारखाने बंद

गॅस पुरवठ्यातील अडथळ्याचा परिणाम उद्योगांवर झाला आहे. मोरबी येथील सिरेमिक उद्योगातील सुमारे 100 कारखान्यांनी उत्पादन थांबवले आहे. मोरबी हे टाइल आणि घड्याळ उत्पादनाचे मोठे केंद्र असून जगातील प्रमुख सिरेमिक हब म्हणून ओळखले जाते. पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर 400 हून अधिक युनिट्स बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

2) पुण्यात गॅस-आधारित स्मशानभूमी बंद

पुणे येथे गॅस टंचाईमुळे महानगरपालिकेने 18 गॅस-आधारित स्मशानभूमी तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर त्या पुन्हा सुरू केल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

3) इंडक्शन कुकरच्या विक्रीत तिप्पट वाढ

स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्याबाबतची अनिश्चितता यामुळे इलेक्ट्रिक स्वयंपाक उपकरणांची मागणी वाढली आहे. कोलकाता येथील चांदणी मार्केट व एज्रा स्ट्रीट परिसरात इंडक्शन कुकरच्या विक्रीत तिप्पट वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

4) घरगुती व व्यावसायिक गॅस महाग

तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ केली असून व्यावसायिक सिलिंडर 115 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.परिस्थिती दीर्घकाळ टिकली तर परिणाम अधिक गंभीर ऊर्जा पुरवठा, उद्योग उत्पादन, वाहतूक आणि घरगुती खर्च यावर या संघर्षाचा परिणाम होऊ शकतो. आखाती प्रदेशातील तणाव लवकर कमी झाला नाही तर भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…

1 दिवस ago

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

2 दिवस ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

3 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

3 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

3 दिवस ago