नवी दिल्ली : मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन व्यवस्थेवर दबाव येऊ नये आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने घरगुती LPG सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. Ministry of Petroleum and Natural Gas कडून दिलेल्या माहितीनुसार आता दोन सिलिंडर बुकिंगमधील किमान कालावधी २५ दिवस करण्यात आला आहे.
यापूर्वी हा कालावधी २१ दिवसांचा होता. नव्या नियमानुसार ग्राहकांना दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान २४ दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे. साठेबाजी आणि ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात सध्या गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा नाही. मात्र काही ठिकाणी सिलिंडर साठवून ठेवण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बुकिंग कालावधी वाढवण्यात आला आहे.
आधीचे नियम
सुरुवातीला सिलिंडर बुकिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी होता
नंतर तो वाढवून २१ दिवस करण्यात आला
आता नव्या निर्णयानुसार २५ दिवसांनीच पुढील बुकिंग करता येणार
उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने १ तारखेला सिलिंडर बुक केला असल्यास पुढील बुकिंग २५ तारखेपूर्वी करता येणार नाही.
LPG सिलिंडरच्या दरात वाढ
पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधन दरात वाढ झाली असून त्याचा परिणाम LPG च्या किंमतीवरही झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये १४.२ किलोचा नॉन-सब्सिडी सिलिंडर सुमारे ९१३ रुपये झाला आहे. यापूर्वी तो ८५३ रुपये होता.
सर्वसामान्यांवर परिणाम
बुकिंगचा कालावधी वाढल्यामुळे जास्त गॅस वापरणाऱ्या कुटुंबांना सिलिंडर वापराचे नियोजन करावे लागणार आहे. मात्र सरकारच्या मते या निर्णयामुळे सर्व ग्राहकांना वेळेवर गॅस मिळण्यास मदत होईल.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…