महाराष्ट्र

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई या स्वायत्त संस्थेतील विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील मजकुराबाबत चौकशी

सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

मुंबई: शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई या स्वायत्त संस्थेतील पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कोर्स रजिस्ट्रेशन फॉर्म व हॉल तिकिटावर आक्षेपार्थ मजकूर छापून आल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची तातडीने दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई यांनी संस्थेला तातडीने चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संस्थेने चौकशी करून अहवाल सादर केला आहे.

संस्थेच्या माहितीनुसार, शासकीय तंत्रनिकेतनाची परीक्षा १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, त्या दिवशी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेला नाही. तसेच, चौकशी समितीने तपासणी केली असता संबंधित विद्यार्थ्याचा Course Registration Form हा बाह्यरीत्या tampering करून त्यावर आक्षेपार्थ मजकूर लिहिला असल्याचे प्राचार्यांनी अहवालात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर, सहसंचालक तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, मुंबई यांनी संस्थेच्या प्राचार्यांना सदर प्रकरणाबाबत सविस्तर तक्रार सायबर सेलकडे तात्काळ दाखल केली आहे.

काही विद्यार्थी यामुळे परीक्षेला बसू शकले नाहीत, असेही वृत्तांत नमूद करण्यात आले होते. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता,परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहिला नाही, असे स्पष्टीकरण सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, मुंबई यांनी दिलेले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

7 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

8 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago