महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचे आदेश, काम कमी भ्रष्टाचार जास्त; ॲड. अमोल मातेले

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील उड्डाणपुलांच्या ‘रिसरफेसिंग’चे तातडीचे आदेश दिले असले तरी त्यामागे कामापेक्षा भ्रष्टाचाराचा खडा टक्का आणि आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय खटाटोप अधिक दिसतो, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

“मुंबईत रस्ते, उड्डाणपुलं, पायाभूत सुविधा या सगळ्यांची दशा अत्यंत वाईट आहे. पावसाळ्यानंतर दुरुस्ती ‘तातडीची’ असतेच, पण दरवर्षी तेच आदेश आणि तेच ढिसाळ काम… फरक फक्त एवढाच कंत्राटदार बदलतात आणि टक्केवारी वाढते.”

ते पुढे म्हणाले “उपमुख्यमंत्री महोदयांनी अचानक फेब्रुवारीची डेडलाइन जाहीर करून स्वतःला ‘कामसू’ दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी मुंबईकरांना हे सारे निवडणुकीपूर्वीचे नाट्य असल्याचं चांगलं कळतं. कंत्राटदारांकडून कोणाला किती परतावा मिळणार यासाठीच ही तातडी दाखवली जात आहे.”

उड्डाणपुलांचा तांत्रिक अहवाल न पाहता थेट रिसरफेसिंगच्या सूचनांमागे संशयास्पद घाई. निवडणूक जवळ आल्यावरच विकासकामांचा सूडौल पाऊस, बाकी वर्षभर शून्य कामगिरी. ‘गुणवत्ता नियंत्रण कक्ष’ हा नावापुरता उपक्रम प्रत्यक्षात कामाचा दर्जा खालावलेला, खर्च मात्र वाढलेला.महापालिका हस्तांतरण प्रक्रियेतील मुद्दे न सोडवता राजकीय शोबाजी आणि फोटोंचा खेळ सुरू.शहरातील रस्त्यांची दुरवस्था वाढल्यावरही जबाबदार विभागांवर शून्य कारवाई.

ॲड. मातेले यांनी स्पष्ट इशारा दिला.“मुंबईकरांच्या पैशाचा हिसका चालवणारी सरकार कंत्राटदारांची साखळी आम्ही उघड करणार. जनतेसाठी काम नव्हे; तर कंत्राटांसाठी राजकारण हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

9 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

9 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

9 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

13 तास ago