महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला ‘जवाहर बालभवन’चे व्यासपीठ; गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम

मुंबई: विद्यार्थ्यांमधील कला, सृजनशीलता आणि नवोन्मेषी विचारांना चालना देण्यासाठी जवाहर बालभवनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी मदत होते, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनतर्फे २ ते ९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘गणेश मूर्ती कृतिसत्र’, ‘वेशभूषा स्पर्धा’ आणि ‘गणेश मूर्ती बनविणे स्पर्धा’ यांचा समावेश आहे.

इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती कृतिसत्र आयोजित करण्यात आले आहे. तर इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पौराणिक वेशभूषेवर आधारित स्पर्धा घेण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, भारतीय संस्कृती आणि सामाजिक संदेश आपल्या कलाकृतीतून प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळत आहे.

यंदा प्रथमच गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच विविध कलाकृतींची मंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी केली.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक करताना भुसे म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढण्यासोबतच भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाबाबतची जाणीव अधिक दृढ होते.

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन ही संस्था ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ठरत आहेत, अशी माहिती बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी दिली.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

57 मिनिटे ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

1 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

1 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

1 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

1 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago