महाराष्ट्र

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडपप्रकरणी जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना घेरले…

मुंबई: हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना सभागृहात घेरले आणि हा महत्वाचा मुद्दा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे अनेक हिंदू देवस्थानांच्या ट्रस्टच्या जमीनी हडप करण्याचा प्रकार घडला असल्याचे आज प्रश्नोत्तराच्या तासात जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

हिंदू देवस्थान जमीनीच्या या प्रकरणाचा तपास एसीबी करत आहे मात्र एसीबीकडून चालढकल होत आहे.  गुन्हेगाराला अटक करण्यात आली नाही. हिंदू देवस्थानच्या जमिनी हडप करणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जमिनी हडप करणारे कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. लवकरात लवकर देवस्थानांना जमिनी परत करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर ते किती शीघ्रगतीने काम करू शकतात हे याच प्रकरणातून दिसते. विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी १८ ऑगस्ट २०२२ ला तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली आणि १९ ऑगस्ट २०२२ ला नव्या अधिकाऱ्याची तिथे नेमणूक झाली. जलद काम करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचे कौतुक असा चिमटा काढतानाच पण तपासही लवकर पूर्ण करा व दोषींना शासन करा असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. दरम्यान हा प्रकार गंभीर असून यावर निश्चितपणे कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नवीन मार्केट यार्ड घावटे कॉम्प्लेक्स येथे वाहन कर्जाच्या झालेल्या व्यवहाराचा…

8 तास ago

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

पुणे: पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या चार गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या…

13 तास ago

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

छत्रपती संभाजीनगर : एका एसटी बसमध्ये दोन वृद्धांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. संबंधित घटनेचा व्हिडिओ…

13 तास ago

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही…

1 दिवस ago

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय…

1 दिवस ago

विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन शेळ्याही जागीच दगावल्या…

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची…

1 दिवस ago