इतके वाईट आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत घाला, कारवाई करा, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार देण्यात येतात धाराशिव तालुक्यातील पाच शाळांमध्ये या बार मध्ये अळ्या सापडल्या. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी हे खेळणे आहे. FDA ने तपासणी न करता याचा पुरवठा झाला कसा असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
पनवेल इथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्या मध्ये गर्भवती माता आणि लहान बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट आहे. आहाराचे पाकीट उघडताच त्यात घाण वास येते त्यात मुंग्या असतात. असा पोषण आहार घरी न आणलेला बरा असे लाभार्थीना वाटते.त्यामुळे पोषण आहारात असा भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांना कारवाई करण्यात यावी.त्यांना काळया यादीत टाकावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष यांनी शासनाने नोंद घेऊन कारवाई करू असे निर्देश दिले.
शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…