Shirur-Sarpanch-Sodat
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज (ता. ११) सरपंचपद आरक्षणाची सोडत मुख्य शिरूर तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. एकूण ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर झाले असून, अनेक गावांमध्ये खुल्या पदामुळे जल्लोष, तर काही गावांत आरक्षणामुळे हिरमोड झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या.
सदर सोडत तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसिलदार प्रकाश मुसळे, गटविस्तार अधिकारी आर. आर. राठोड, निवासी नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. खास आकर्षण ठरले ते शालेय विद्यार्थिनी समिक्षा गिरमकर हिच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
खुल्या सरपंचपदासाठी प्रमुख गावांची नावे..
यंदा खुल्या वर्गासाठी आरक्षित झालेले काही प्रमुख व मोठ्या गावांची नावे पुढीलप्रमाणे:
शिरूर ग्रामीण, सणसवाडी, रांजणगाव गणपती, तळेगाव ढमढेरे, सरदवाडी, टाकळी हाजी, मलठण, भांबर्डे, सविंदणे, बाभुळसर खुर्द, चिंचणी, काठापूर खुर्द, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, चांडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, कर्डेलवाडी, मांडवगण फराटा, सोनेसांगवी, दहिवडी, इनामगाव, खैरेवाडी, जातेगाव खुर्द आदी. या गावांमध्ये स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार व ग्रामस्थांनी यशस्वी मोहीम राबवण्यासाठी तयारी सुरू केली असून काही ठिकाणी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
महिलांसाठी आरक्षित झालेली सरपंचपदे…
सरपंचपदावर महिलांना संधी देण्यासाठी अनेक गावांत पद आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख गावांचा समावेश आहे:
शिक्रापूर, पिंपरखेड, उरळगाव, चिंचोली मोराची, गणेगाव दुमाला, धानोरे, पाबळ, निमोणे, कोंढापुरी, गुनाट, दरेकरवाडी, मोटेवाडी, कोरेगाव भीमा, आपटी, कळवंतवाडी, आंबळे, विठ्ठलवाडी, निर्वी आदी.
प्रवर्गनिहाय आरक्षण सूची:
अनुसूचित जाती (SC): हिवरे, आमदाबाद, गोलेगाव, वाजेवाडी
अनुसूचित जाती महिला: निमगाव म्हाळुंगी, जांबुत, मुखई, वढू बु
अनुसूचित जमाती (ST): कुरूळी
अनुसूचित जमाती महिला: माळवाडी, वडगाव रासाई
इतर मागास वर्ग (OBC): कासारी, शरदवाडी, अण्णापूर, कारेगाव, कोळगाव डोळस, मिडगुलवाडी, वाघाळे, पारोडी, खंडाळे, फाकटे, कवठे येमाई, आंधळगाव, कान्हूर मेसाई
इतर मागास वर्ग महिला: चव्हाणवाडी, करडे, म्हसे बु, पिंपरी दुमाला, वाडा पुनर्वसन, सादलगाव, पिंपळे जगताप, निमगाव भोगी, पिंपळसुटी, आलेगाव पागा, नागरगाव, बाभुळसर बु, रावडेवाडी
आरक्षण निश्चित होताच इच्छुक उमेदवार, समर्थक, राजकीय गटांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः खुल्या गटांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे, तर काही आरक्षित गटांत नवे चेहरे उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणात, आरक्षण सोडतीनंतर शिरूर तालुक्यात सरपंच निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून, गावोगावी नव्या राजकीय समीकरणांचा खेळ रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
आरक्षण सोडत पूर्णपणे पारदर्शकपणे आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडली आहे. ग्रामपंचायतीतील नेतृत्व आता विविध सामाजिक घटकांना मिळणार असून महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे.
– बाळासाहेब म्हस्के, शिरूर तहसिलदार
केंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल साकोरे यांची बिनविरोध निवड
शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…