महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ; अंबादास दानवे

नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला साजेशा व्यक्तीमत्त्वाची निवड विधान परिषदेचे सभापती करण्यावर सर्वांनी एकमत केलं. विरोधी पक्षानेही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.आपली कारकीर्द येणाऱ्या काळात चांगली व राज्याच्या प्रगतीची जावो, अशा शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी नवोनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांना आपल्या स्वागतपर भाषणात दिले.

आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज आहात. आज तुम्ही या सर्वोच्च पदी बसल्याचा सर्वात जास्त आनंद तुमच्या माऊलीला होत असेल असे म्हणत दानवे यांनी शिंदे यांच्या सभागृहात बसलेल्या आईच स्वागत केलं.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रा. राम शिंदे यांच्या राजकिय कारकीर्दीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. तसेच जलयुक्त शिवार योजनेत मंत्री झाल्यावर केलेल्या कामाचं कौतुक केलं. आपल्या कामात आमचं पूर्ण सहकार्य राहील. सभागृहात डाव्या बाजूला बसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांवर जास्त लक्ष ठेवा अशी विनंती दानवे यांनी सभापती यांना केली. आपल्या राजकीय जीवनात जरी संघर्ष राहिला असला तरी विरोधी पक्ष राज्याच्या हितासाठी संघर्षाची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घेईल, असे आश्वासन दानवे यांनी दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago