शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

शिरुर (तेजस फडके) राज्यात एक महिन्यापुर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. शिरुर-हवेली तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर महिनाभरातच शिरुर तालुक्यातील शिक्रापुर, रांजणगाव MIDC आणि शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा विक्री, पान मसल्याच्या नावाखाली खर्रा विक्री, गावठी दारु, जुगार, मटका तसेच अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.

 

लोकसभा निवडणुकीपुर्वी पुणे जिल्ह्यात अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक म्हणुन पंकज देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्याना मोठया प्रमाणावर आळा बसला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरही अवैध धंदे बंदच होते. मात्र विधानसभा निवडणुक झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात अवैध धंद्याना पुन्हा सुरवात झाली आहे. तसेच शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतही पुन्हा अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.

 

शिरुर तालुक्यात पोलिसांचा धाक आहे का…?

शिरुर तालुक्यात काही पोलिस, पत्रकार तसेच आमदार, खासदार यांचे नातेवाईक स्वतःच्या खाजगी चारचाकी गाडयांना पोलिस, पत्रकार, आमदार, खासदार अशा विविध नावाच्या पाट्या लाऊन अनेकजण बिनधास्तपणे वावरत आहेत. तसेच अनेक दुचाकी गाड्यांना फॅन्सी नंबरप्लेट तर काही दुचाकी बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावलेले असुन या गाड्या सर्रासपणे शिरुर तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी वावरत असतात. त्यामुळे गुन्हेगारीच प्रमाण वाढत असुन शिरुर तालुक्यात खरंच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे का…? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडला आहे.

 

तालुक्यात काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट…?

शिरुर तालुक्यात अनेक चारचाकी गाडयांना काळ्या काचा असुन त्यातल्या अनेक गाड्या राजकीय पुढाऱ्यांच्या नातेवाईकांच्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीने जर वाहतुकीचा एखादा नियम मोडला तर पोलिस तात्काळ त्याच्यावर कारवाई करतात. परंतु राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांवर कारवाई करण्यासाठी मात्र पोलिस धजावत नाहीत. त्यामुळे राजकीय लोकांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय असेच काहीसे चित्र सध्या शिरुर तालुक्यात दिसत आहे.

(क्रमशः) 

शिरुर तालुक्यात पती-पत्नीची एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद

शिरुर तालुक्यात भरधाव ट्रॅक्टर झोपडीत शिरल्याने पती-पत्नीचा मृत्यू

पायी चालताना ह्या चुका कधीच करू नका

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

10 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

11 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

11 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

16 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

1 दिवस ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

1 दिवस ago