महाआरोग्य शिबीर हे लोककल्याणासाठी महत्वाचे पाऊल; खासदार श्रीकांत शिंदे

मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव, संपर्क नेते मुंबई सिद्धेश कदम यांनी या शिबिराचे आयोजन केले.

हे शिबिर सन्मित्र क्रीडांगण, गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. डोळे तपासणी, मोफत चष्मा वाटप, महिलांचे आजार, कर्करोग तपासणी, बालरोग, दंत काळजी, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, औषधोपचार आणि ईसीजी तपासणी, सीबीसी तपासणी आणि रक्तदान शिबीर अशा विविध आरोग्याशी संबंधित तपासण्या आणि उपचारांचा समावेश होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण उपक्रमाला माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, भाऊसाहेब चौधरी, किरण पावसकर, अमेय घोले, शिवसेना नेत्या मीना कांबळी, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे यांनी उपस्थित राहून या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष मत

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले,”महाआरोग्य शिबिर हा लोककल्याणासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. आरोग्य हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनात मूलभूत भूमिका बजावते. अशा उपक्रमांमधून समाजातील गरजू लोकांना मोफत आणि उत्तम वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे.”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया*

“अतिशय चांगला आणि लोककल्याणकारी उपक्रम सन्माननीय नेते रामदासजी कदम यांच्या विचारांबरोबरच सिद्धेश कदम यांनी उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. या शिबिरामुळे अनेक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मदत मिळाली.” असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

कार्यक्रमाचे विशेष संयोजन

नगरसेवक शंकर हुडारे, दिंडोशी विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित, वैभव भराडकर, स्वप्रिल टेंबवलकर, अल्ताफ पेवेकर, ज्ञानेश्वर सावंत, वैषवी घाग, प्रियांका आंबोळकर, शिल्पा वेळे, विशाखा मोरये, पूनम वैद्य यांनी या उपक्रमाचे विशेष संयोजन केले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

2 तास ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

2 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

2 दिवस ago

मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे…

2 दिवस ago