क्राईम

तू गाडी थांबवली का नाहीस? या कारणावरून झाले भांडण अन् पुढे…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पोंदेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे दुपारच्या वेळेस मोटार गाडी मागे घेण्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ प्रकरणी दोन्ही बाजूने फिर्याद दाखल झाली असून एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल दत्तात्रय टाव्हरे यांचा भाऊ संदीप वाळुंज याने गणेश लोले यास गाडी थांबवण्यास सांगितले होते. तर तू गाडी थांबवली का नाहीस? या कारणावरून गणेश लोले याने फिर्यादीचा भाऊ संदीप वाळुंज यास शिवीगाळ व दमदाटी केली. तिथे हजर असलेले राजेश पोंदे यांनी संदीप वाळुंज यास मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मुलगा निखिल टावरे याला संदेश पोंदे, गणेश लोले, तुषार पोंदे, राजू मखर,यांनी मारहाण केली. तेव्हा फिर्यादी या भांडण सोडविण्यास गेल्या असता राजेश पोंदे याने फिर्यादी यांची साडी ओढून मान खाली दाबून मारहाण केली. फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. असे फिर्यादित म्हटले आहे.

गणेश लोले यांनी ही फिर्याद दाखल केली असून, विठ्ठल बाबुराव वाळुंज, संदीप विठ्ठल वाळुंज, रामदास तात्याबा वाळुंज (सर्व राहणार पोंदेवाडी), गणेश टाव्हरे (राहणार निरगुडसर), गणेश पोखरकर (राहणार सविंदणे ता. शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहा. निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मडके व सांगडे करत आहेत.

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत

Video; ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या लढयाला अखेर यश शिक्रापुर पोलिसांकडुन ‘त्या ‘खुनाचा गुन्हा उघड

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago