महाराष्ट्र

महाराष्ट्राने राजासारखं मन असलेला नेता गमावला; अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रशांत जगताप भावुक

मुंबई: महाराष्ट्राचे लाडके नेते, आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दादांच्या जाण्याचा धक्का आजही स्वीकारणं कठीण असल्याचं सांगत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी ज्या ठिकाणी अजितदादांना मुखाग्नी देण्यात आला, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी दादांसोबतच्या २४ वर्षांच्या सहवासातील असंख्य आठवणी मनात दाटून आल्याने प्रशांत जगताप भावुक झाले. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर भावनिक पोस्ट शेअर करत अजितदादांशी असलेलं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं उलगडून दाखवलं आहे.

२४ वर्षांचं नातं, अखेरपर्यंत जपलेली आपुलकी

१० जून १९९९ ते १ जुलै २०२३ या कालावधीत तब्बल २४ वर्षे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक कार्य केल्याचं जगताप यांनी नमूद केलं आहे. दादांनी दिलेलं मार्गदर्शन, विश्वास आणि पाठबळ यामुळेच पक्ष संघटना, महापालिका अशा विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

जुलै २०२३ मध्ये अजितदादांनी वेगळी राजकीय वाट निवडली, तरीही विचारांवर ठाम राहून भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानंतरही दादांनी कधीही मनात आकस ठेवला नाही, उलट नेहमीच सन्मानाचीच वागणूक दिली, असंही जगताप यांनी स्पष्ट केलं.

आजारपणात दाखवलेली मायेची बाजू

जून २०२२ मध्ये चेहऱ्याला पॅरालिसिस झाल्यानंतर अजितदादांनी दाखवलेली काळजी आठवताना जगताप भारावून गेले. “प्रशांत… हे तू चुकीचं केलंस” असं म्हणत दादांनी थेट फोन करून उपचारांची जबाबदारी स्वतः घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. “प्रशांत माझा घरातला माणूस आहे” असं डॉक्टरांना सांगणारा नेता म्हणजे केवळ राजकारणी नव्हे, तर हळवा माणूस होता, असं जगताप म्हणाले.

रॅलीतील प्रसंगातून दिसलं नेतृत्वाचं मोठेपण

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजितदादांनी गर्दीतही आपल्या कार्यकर्त्याची तब्येत जपल्याचा एक प्रसंग जगताप यांनी शेअर केला. औषधोपचार सुरू असतानाही धावपळ करत असल्याचं पाहून दादांनी रॅली थांबवून काळजी व्यक्त केली. “असा नेता विरळाच” असल्याचं जगताप यांनी नमूद केलं.

राजासारखं मन असलेला राजा माणूस

राजकीय मतभेद असूनही दादांनी कधीही वैयक्तिक संबंध तोडले नाहीत. उलट पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत “प्रशांत जगताप आमचा महापौर होता” असं सांगत सार्वजनिक सन्मान दिला. विरोधात उमेदवारही दिला नाही, यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो, असं जगताप म्हणाले.

“राजासारखं मन असलेला राजा माणूस महाराष्ट्राने गमावला आहे. आज पुन्हा एकदा जिथे दादांना अखेरचा निरोप दिला, तिथे येऊन वंदन केलं,” अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

27 मिनिटे ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

1 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

1 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

20 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

24 तास ago