महाराष्ट्र

अजित पवार विमान अपघातातील पायलट जिवंत” सोशल मीडियावरील अफवांमागचं नेमकं सत्य काय

मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं आहे. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातानंतर सोशल मीडियावर एक गोंधळजनक माहिती व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या विमानाचा पायलट जिवंत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर या प्रकरणावर संबंधित पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सत्य परिस्थिती समोर आणली आहे.

नेमका गोंधळ कुठे झाला?

बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या ‘लिअरजेट ४५’ या खासगी विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर विमानाचं ‘मूव्हमेंट लेटर’ सोशल मीडियावर व्हायरल झालं. या कागदपत्रावर कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश अशी पायलट्सची नावे नमूद होती. हे पत्र पाहून अनेकांनी खातरजमा न करता कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो शोधून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.

पत्नीची भावूक पोस्ट: “माझे पती सुरक्षित आहेत”

कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संजाम सहनी यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अफवांवर स्पष्टीकरण दिलं.“कृपया या चुकीच्या बातम्या थांबवा. कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते त्या अपघातग्रस्त विमानात नव्हते. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत,” असं भावूक आवाहन त्यांनी केलं.या पोस्टनंतर सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम मिळाला.

ऐनवेळी पायलट बदलल्यामुळे झाला गैरसमज

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणाच्या अगदी शेवटच्या क्षणी विमानाच्या वैमानिकामध्ये बदल करण्यात आला होता. मूळ नियोजनानुसार कॅप्टन साहिल मदान हे विमान चालवणार होते. मात्र ऐनवेळी ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे देण्यात आली.दुर्दैवाने, ज्या विमानाचं नेतृत्व कॅप्टन सुमित कपूर यांनी केलं, त्याच विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

या दुर्घटनेतील मृतांची अधिकृत नावे

अजित पवार – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

विदिप जाधव – सुरक्षा रक्षक

कॅप्टन सुमित कपूर – मुख्य वैमानिक

शांभवी पाठव – सह-वैमानिक

पिंकी माळी – फ्लाईट अटेंडंट

एकीकडे राज्याने एक अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असताना, दुसरीकडे सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मात्र कॅप्टन साहिल मदान यांच्या पत्नीने वेळेत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या गोंधळामागचं सत्य स्पष्ट झालं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

12 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago