महाराष्ट्र

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या २४ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (५ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथे उघडकीस आली. निकिता ऋषीकेश वाकळे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

निकिताचा विवाह एप्रिल महिन्यात ऋषीकेश वाकळे याच्यासोबत झाला होता. निकिता बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेली होती, तर तिचा पती बीएस्सी नर्सिंग झालेला असून खासगी रुग्णालयात नोकरी करत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, निकिताचे वडील गणेश अर्जुन पठारे (वय ४७, रा. देव पिंपळगाव, ता. बदनापूर) यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा निकिताकडे लावला जात होता. पैशांसाठी तिला शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या छळाला कंटाळून निकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला.

या तक्रारीवरून हर्सूल पोलिसांनी पती ऋषीकेश सोमीनाथ वाकळे (वय २६) याच्यासह रेखा सोमिनाथ वाकळे (वय ३८), सोमिनाथ कचरू वाकळे (वय ५३), दीक्षा तांबे (वय २९), सुमीत सोमिनाथ वाकळे (वय २०), अनिता दामोधर पवार (वय ३५) आणि मंदा हरिदास दारकुंडे (वय ३३, सर्व रा. सुरेवाडी, जाधववाडी) अशा सात जणांविरुद्ध छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

घाटी रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश

घटनेची माहिती मिळताच निकिताच्या माहेरच्या सुमारे २०० नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली. सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. याचवेळी काही नातेवाइकांनी हर्सूल पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

48 मिनिटे ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

55 मिनिटे ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

1 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

1 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

2 तास ago

आई-बहीण, पत्नीबाबत अश्लील शिवीगाळ अन् जीभ कापण्याची धमकी

आमदार संजय गायकवाडांविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार पुणे: संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.…

2 तास ago