महाराष्ट्र

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश, रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

चाकण: यंदाच्या पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडल्याने व रस्ता उखडल्याने खराब झालेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून नुकतीच खेड तालुक्यातील लांबीतील दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे लवकरच पूर्ण होऊन वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही काळापासून तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील मोठे-मोठे खड्डे आणि अनेक ठिकाणी उखडलेला रस्ता यामुळे सातत्याने अपघात होत होते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १०१५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु त्यानंतर या रस्त्यावर एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यामुळे या एलिव्हेटेड रस्त्याचा डीपीआर तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरु होण्यास वेळ लागणार असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी तळेगाव चाकण शिक्रापूर व पुणे शिरुर या दोन्ही महामार्गांची तातडीची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दुरुस्तीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर केला होता.

खरं तर ऑक्टोबर महिन्याच्या मध्यासच तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरुर या दोन्ही महामार्गावरील दुरुस्तीची कामे सुरु होणे अपेक्षित होते. परंतु यंदा पावसाळा दीर्घकाळ लांबल्याने दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पावसाळा थांबल्याचे दिसताच तातडीने काम सुरु करण्याचे निर्देश खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांना दिले होते. त्यानुसार दुरुस्तीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून मावळ तालुक्यातील रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर आज खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ज्याठिकाणी रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. त्याठिकाणी खड्डे बुजवून उखडलेल्या संपूर्ण भागाचे डांबरीकरण करण्यात येणार असून या दुरुस्तीसह देखभालीची जबाबदारीही सदर कंत्राटदारावरच असल्याने आगामी काळात रस्त्यांची वेळोवेळी दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे रस्ता सुस्थितीत होऊन वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago