प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
कल्याण: ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांद्वारे प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागणे, अतिरिक्त शुल्काची सक्ती करणे आणि आर्थिक शोषणाच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. प्रवास स्वीकारल्यानंतर अतिरिक्त रकमेची मागणी करणे, ती न दिल्यास राईड रद्द करणे किंवा प्रवाशांना मानसिक त्रास देणे अशा प्रकारांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत होत्या.
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री सरनाईक यांनी हा प्रकार ग्राहकविरोधी असल्याचे स्पष्ट करत संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच ॲप-आधारित टॅक्सी सेवा क्षेत्रातील मनमानी रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन ॲग्रीगेटर धोरण जाहीर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलल्याने राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…