क्राईम

शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या वर्षभरापासून “लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार” अशा आशयाचे उघडपणे धमकावणारे स्टेटस सोशल मीडियावर त्याने ठेवले होते. अखेर, पूर्ववैमनस्याच्या याच रागातून या अल्पवयीन मुलाने रात्रीच्या अंधारात घराबाहेर गाढ झोपलेल्या व्यक्तीच्या गळ्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे शिरूर तालुका हादरला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब बबन तांबे (रा. रानमळा वस्ती, वरुडे, ता. शिरूर) असे या हत्याकांडात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (ता. ८) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब तांबे हे आपल्या घराबाहेर झोपले होते. आई हौसाबाई तांबे या ओट्यावर तर ते ओरंड्यावर गाढ झोपले होते. याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा वार इतका भीषण होता की, बाळासाहेब यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर रानमळा वस्ती परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रकाश बबन तांबे (वय ४१) यांनी या हत्येप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि प्रभारी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तातडीने तपास चक्र फिरवली. पोलिसांनी गावातील एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, हा अल्पवयीन आरोपी गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह आणि धमकावणारे स्टेटस ठेवत होता. ‘एकाचा मर्डर, लवकरच जेल’ अशा आशयाचे मेसेज तो सातत्याने प्रसारित करत असल्याची चर्चा आता गावात सुरू आहे. पोलिस आता त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलची देखील कसून तपासणी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बाळासाहेब तांबे आणि या अल्पवयीन मुलामध्ये वर्षभरापूर्वी तसेच घटनेच्या चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मोठा वाद झाला होता. याच वादाचा राग या अल्पवयीन मुलाच्या मनात होता. त्याने रात्रीच्या वेळी झोपलेल्या बाळासाहेबांच्या गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले. गुन्हा केल्यानंतर त्याने वापरलेला रक्ताने माखलेला कोयता लपवून ठेवला होता, जो पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

वरुडेत बकरे चारण्याच्या वादातून मेंढपाळांना मारहाण

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

8 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

8 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

8 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

12 तास ago