महाराष्ट्र

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गांधी भवन, कुलाबा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या प्रशिक्षण सत्रात मुख्य प्रशिक्षक म्हणून असद उस्मानी उपस्थित होते. त्यांनी SIR प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, अर्ज प्रक्रिया, आक्षेप नोंदविण्याच्या पद्धती तसेच पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास तेजस चंदूरकर, प्रज्ञा धवले, फरहान मन्सुरी, शेखर जगताप, शिव जतन यादव, अब्दुल समद शाह, मितेश सोनकर, अमनदीप सैनी, आसिफ खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना झीनत शबरीन यांनी सांगितले की, SIR मोहिमेच्या आधी ज्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली, तेथे लाखो मतदारांची नावे वगळली गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे मुंबईत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये, यासाठी युवक काँग्रेसने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, लोकशाहीतील मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून, मतदार यादीतून नाव वगळले जाणे हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर आघात आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोरपणा राखण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदारांना मार्गदर्शन व मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, “गिग वर्कर्स न्याय अभियान” या उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गिग इकॉनॉमीतील कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago