महाराष्ट्र

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. “नारी शक्ती वंदन”च्या नावाखाली प्रत्यक्षात “सत्ता शक्ती वंदन” सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

२८ सप्टेंबर २०२३ रोजी १०६ वी घटनादुरुस्ती करून महिला आरक्षण कायदा मंजूर झाला, हे स्वागतार्ह असले तरी त्याचे संपूर्ण श्रेय भाजप घेते आहे, ही राजकीय ढोंगबाजी असल्याचे मातेले म्हणाले. या विधेयकाला ४५४ खासदारांनी समर्थन दिले असून केवळ २ जणांनी विरोध केला होता. त्यामुळे INDIA आघाडीचाही त्यात मोठा वाटा असून भाजपने एकट्याने श्रेय घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा त्यांनी गंभीरतेने मांडला. जनगणना आणि परिसीमन (Delimitation) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू होणार असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. “आज घोषणा आणि उद्या विसर” हीच भाजपची कार्यपद्धती असल्याचे ते म्हणाले.

परिसीमनानंतर लोकसभा जागा वाढण्याची शक्यता असून त्यामध्ये आरक्षण लागू करून राजकीय गणित साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “हे महिला सक्षमीकरण नसून सत्ता टिकवण्याचे राजकारण आहे,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच, काही खासदारांनी “आताच ५० टक्के महिला आरक्षण लागू करा” असे खुले आव्हान दिले असताना भाजपकडून ठोस उत्तर न आल्याची टीकाही त्यांनी केली. यामागील हेतू विलंब करून राजकीय श्रेय घेण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षणाचा वापर भावनिक मुद्दा म्हणून केला जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कोणतीही घाई नसल्याचे त्यांनी सांगितले. “महिलांच्या नावाने टाळ्या घ्या आणि जागा वाढवून सत्ता वाचवा,” असा भाजपचा साधा राजकीय फॉर्म्युला असल्याची टीका त्यांनी केली.

महिला आरक्षणाचा कायदा स्वागतार्ह असला तरी तो तात्काळ लागू न करणे, परिसीमनाच्या आड लपवणे आणि राजकीय श्रेय लाटणे यामुळे भाजपचा दुहेरी चेहरा उघड होत असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

ॲड. अमोल मातेले

प्रवक्ता व युवक मुंबई अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago