महाराष्ट्र

नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराजांचे नाव

राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांच्या नावे देण्याच्या उपक्रमात पुढचे पाऊल

नागपूर: मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांचे नाव नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराजांच्या जयंतीदिनी 8 डिसेंबर रोजी हा नामांतर सोहळा होणार आहे. राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांचे नाव देण्याचा निर्णय कौशल्य विभागाने घेतला असून या निर्णयाचे हे पुढचे पाऊल असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

संत जगनाडे महाराजांवर संत तुकारामांचा मोठा प्रभाव होता. मानवतेची शिकवण देणाऱ्या संत तुकारामांच्या गाथेतील समतेचे विचार त्यांनी अभंग रूपाने व्यक्त केले. तसेच संत तुकाराम यांच्या गाथेचा भाग तन्मयतेने शोधून त्यांनी समाजासाठी संपूर्ण गाथा बहाल केली. त्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले.

नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या या नामांतर सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार , एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि पूर्व नागपूर मतदार संघाचे आमदार श्री. कृष्णा खोपडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

महापुरुष संत जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करावा अशी ही संकल्पना यावेळी मंत्री लोढा यांनी मांडली आहे. याच अनुषंगाने नागपूर येथील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, प्राचार्य, प्रादेशिक अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत. संत जगनाडे महाराजांच्या सामाजिक कार्य, समतेचा संदेश विषयी मार्गदर्शनपर माहिती कार्यक्रमादरम्यान दिली जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जगाला गवसणी घालणारा भारत; 2047 पर्यंत महासत्ता होण्यासाठी राष्ट्रीय रोडमॅप

नवी दिल्ली : भारताला 2047 पर्यंत विकसित, समृद्ध, सुरक्षित, तंत्रज्ञानसमृद्ध आणि जगाच्या विकासात नेतृत्व करणारी…

6 तास ago

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तक समितीवरून महेश तपासेंचा केंद्रावर हल्लाबोल

‘अभ्यासक्रम सुधारणा नव्हे, वैचारिक ताबा मिळविण्याचा प्रयत्न’; आरएसएस-भाजपशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीचा आरोप मुंबई: इयत्ता ११ वी…

7 तास ago

पिंपळवंडीतील घटनेने संताप; वैशाली नागवडे यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

मुंबई: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडलेल्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी…

8 तास ago

‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या मागणीवरून शिवसेनेचा उबाठावर बोचरा प्रहार

मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी उबाठा गटाने न्यायालयात केल्यानंतर शिवसेनेने सोशल मीडियावर बोचरे…

8 तास ago

‘छात्रों की गुंज’साठी पुण्यात काँग्रेसची जोरदार तयारी; भाजपवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’…

8 तास ago

शहरांच्या बकालपणावर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘शहर परिवर्तन गटा’चा शुभारंभ

मुंबई: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे.…

8 तास ago