महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या पुढाकाराने दादर येथील टिळक भवनमध्ये एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. निवडणूक व्यवस्थापन, महापालिका प्रशासन आणि माहिती अधिकार (RTI) या महत्त्वाच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका व आरटीआयसंदर्भात सविस्तर माहिती दिली. “माहिती कशी मिळवायची आणि जनहितासाठी तिचा प्रभावी वापर कसा करायचा” याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच “बूथ मजबूत करा, मग बाकीचे सर्व होऊ शकते,” असा ठाम संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया, आवश्यक अटी आणि काळजीपूर्वक पाळावयाच्या बाबींची माहिती दिली.

माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी मुंबई महानगरपालिकेची रचना, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि कामकाजाची पद्धत यावर विस्तृत प्रकाश टाकला. “कोणत्या विभागाचे कोणते काम आहे आणि नागरिकांच्या सेवेत जनप्रतिनिधींनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात” याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

भारतीय युवक काँग्रेसचे सोशल मीडिया चेअरमन मनु जैन यांनी महापालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिले. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रचार, संवाद आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या विविध रणनीती बाबत मार्गदर्शन केले.  या शिबिरात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी, सचिव प्रभारी पवन मजेठिया, सचिव हरगुन सिंह यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मुंबई युवक काँग्रेसतर्फे आयोजित हे प्रशिक्षण शिबीर नव्या कार्यकर्त्यांसाठी ज्ञानवर्धक ठरले. आगामी निवडणुकीत प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक दिशा, माहिती आणि आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया सहभागी झालेल्या पदाधिका-यांकडून व्यक्त करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

21 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago