महाराष्ट्र

विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका…

मुंबई: भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून, 2025 रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उप सभापती श्री. हरिवंश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होणार असून यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री. अजित दादा पवार, विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे, लोकसभेच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख श्री. अर्जुन खोतकर परिषदेस उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर दिनांक 24 जून, 2025 रोजी लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांची वार्ताहर परिषद होईल.

या राष्ट्रीय परिषदेमध्ये “Role of Estimates Committee in Effective Monitoring and Review of Budget Estimates for Ensuring Efficiency and Economy in Administration” अर्थात, “प्रशासनीक कार्ये सक्षमपणे आणि अल्पव्ययासह होतील याची सुनिश्चिती करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका” या विषयावर या परिषदेमध्ये विचारमंथन होईल.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये संसदेच्या तसेच सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य देखील या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

अंदाज समित्यांच्या शिफारसी प्रशासनातील गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सरकारी खर्चाचे प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टिने अत्यंत उपयुक्त ठरत असतात. जानेवारी, 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेली लोकसभा अध्यक्ष श्री.ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील 84 वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद, उप राष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांचे महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठीचे जुलै, 2024 मधील संबोधन, भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या शुभहस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त 03 सप्टेंबर, 2024 रोजीचा ग्रंथप्रकाशन सोहळा या ऐतिहासिक कार्यक्रमांच्या मालिकेत आता ही परिषद देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago