आरोग्य

रात्री उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवून झोपलं तर खरंच काही फायदा हाेतो

लसूण जवळपास रोज जास्तीत जास्त भारतीय भाज्या किंवा पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणाची फोडणी दिल्याशिवाय पदार्थांना टेस्टच येत नाही. लसणानं जेवणाला टेस्ट तर मिळतेच, सोबतच आरोग्याला सुद्धा एकापेक्षा एक जबरदस्त फायदे मिळतात. त्यामुळे आयुर्वेदात सुद्धा लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं. लसणामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. म्हणून लसूण हृदयरोग दूर ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो.

रोज सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देत असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केवळ लसूण खाऊनच याचे फायदे मिळतात असं नाही. लसूण न खाताही तुम्हाला याचे फायदे मिळू शकतात. पूर्वी लोक झोपताना उशीखाली लसणाची एक कळी ठेवायचे. आता यानं काय होतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

लसणातील पोषक तत्वं

लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अ‍ॅलिसिन नावाचं औषधी तत्त्व असतं. त्यामुळ फंगस, बॅक्टेरिया दूर होण्यास मदत मिळते.

घरातील हवा शुद्धा करतो लसूण

तुम्ही ऐकलं असेल की, पूर्वी घराच्या एखाद्या कोपऱ्यात लसूण बांधून ठेवत होते. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले बॅक्टेरिया, विषाणू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची कळी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

झोप चांगली लागते

असं मानलं जातं की, उशीखाली लसणाची कळी ठेवून झोपल्यानं झोपेची क्वालिटी सुधारते आणि झोपेसंबंधी इतरही समस्या दूर होतात. याचं कारण लसणामध्ये सल्फर असतं. ज्याच्या गंधामुळे तुम्हाला शांत वाटतं आणि झोप चांगली येते.

नकारात्मक ऊर्जा दूर होते

लसूण नकारात्मक उर्जा खेचून घेतो आणि सकारात्मक उर्जा देतो. त्यामुळे आजही अनेक लोक लसणाची एक कळी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

कफ दूर होतो

लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. तसेच पोटाच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. शरीरातील अनेक विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडतात.

गॅस होत नाही

पोटात गॅस तयार होण्याची समस्या लसूण दूर करतो. लसूण हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो. लसणाचा गंध या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

4 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago