महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ साजरा; आंदोलन करत गद्दारांचा केला निषेध…

मुंबई: पन्नास खोके, एकदम ओके… पन्नास खोके खाऊन माजलेत बोके…खोके सरकार हाय हाय,गद्दारांना इथे जागा नाय… महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दारांच्या विरोधात आंदोलन केले.

आज ‘गद्दार दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी भवनच्या बाहेर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हातभार लावणार्‍या चाळीस गद्दारांच्या विरोधात हे जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सहभाग नोंदवला. याशिवाय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान पोलीसांनी प्रदेश कार्यालयात येणाऱ्या युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना अगोदरच ताब्यात घेऊन आंदोलन करण्यापासून रोखले त्यावेळी महेबूब शेख यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

6 मिनिटे ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

8 मिनिटे ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

13 मिनिटे ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

34 मिनिटे ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

39 मिनिटे ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

14 तास ago