महाराष्ट्र

राष्ट्रवादीत नवं राजकीय द्वंद्व! रोहित पवारांचे आरोप आणि सुनेत्रा पवार–नरेश अरोरा यांच्या भेटीने खळबळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. ज्यांच्यावर रोहित पवार यांनी गंभीर आक्षेप घेतले होते, त्याच नरेश अरोरा यांच्या टीमसोबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये चर्चा केल्याने पक्षात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवारांचे आक्षेप आणि दावे

अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर तब्बल तेरा दिवसांनी रोहित पवारांनी पत्रकार परिषदांची मालिका घेतली होती. या परिषदांमध्ये त्यांनी अजित पवार गटातील काही प्रमुख नेत्यांवर थेट निशाणा साधला. त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश होता.

पण त्यापुढे जात रोहित पवारांनी डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख आणि अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यावरही तीव्र आरोप केले. अजित पवारांना अरोरा यांना दिलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचे होते; मात्र पक्षातील काही दुसऱ्या फळीतील नेत्यांनी ते रद्द करू नये, असा दबाव टाकल्याचा दावा त्यांनी केला. “चार-पाच नेत्यांनी अजितदादांना एकटे पाडले होते आणि ते आमच्याशी संवादात होते,” असेही रोहित पवारांनी म्हटले होते.

नरेश अरोरा टीमसोबत सुनेत्रा पवारांची चर्चा

या आरोपांनंतरही सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये नरेश अरोरा यांच्या टीमसोबत बैठक घेतली. या टीममध्ये अरोरा यांच्या बंधूंचाही समावेश होता. बैठकीचे तपशील अधिकृतपणे जाहीर झाले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पुढील पंधरा दिवसांत निर्णय होणार असल्याच्या चर्चा त्याच वेळी रंगल्या.सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्षच?

दरम्यान, कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील, असे वक्तव्य केले. मात्र त्याचवेळी प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावर कायम राहतील, असे सांगत त्यांनी राजकीय चर्चांना अधिकच उधाण आणले.या सर्व घडामोडींमुळे शरद पवार कुटुंब आणि अजित पवार कुटुंब यांच्यातील राजकीय अंतर अधिक स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे. शरद पवार कुटुंबाच्या वतीने भूमिका मांडणाऱ्या रोहित पवारांनी नरेश अरोरांवर आक्षेप घेतल्यानंतरही सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी अरोरा टीमशी चर्चा केल्याने रोहित पवारांच्या कथनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राष्ट्रवादीतील ही अंतर्गत सत्तासंघर्षाची लढाई आगामी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

46 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

50 मिनिटे ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

54 मिनिटे ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago