1) निर्गुंडी वनस्पती शरीराला कुठल्याही प्रकारच्या आजारापासून वाचवायला मदत करते. फुफ्फुसात सूज येणे, छातीत दुखणे किंवा जडपणा, शरीरात पेटके इत्यादी समस्येवर या वनस्पतीच्या पानांचा वापर करून किंवा बिया वापरल्या तरी आराम मिळतो.
2) बऱ्याच जणांना लघवी करताना त्रास होतो किंवा लघवी करताना जळजळ जाणवते. या समस्यावर निर्गुंडी उपयुक्त आहे. एवढेच नाहीतर रक्ताच्या संबंधित सर्व विकारांवर देखील ही उपयुक्त आहे.
3) रक्त शुद्धीकरण म्हणून याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. निर्गुंडीचा वापर हा शरीरातील नसा निरोगी ठेवण्यासाठी आणि मज्जा संस्थेशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांसाठी केला जातो व याचा उपयोग डेकोकशन, पावडर आणि गोळ्या बनवून केला जातो.
4) सर्दी, खोकला तसेच कफचा त्रास असेल तर निर्गुंडी वनस्पतीचा हर्बल चहा पिऊन त्यावर आराम मिळवू शकता.
5) या वनस्पतीचे सेवन पचनक्रिये मध्ये देखील मदत करते व यामुळे मळमळ तसेच बद्धकोष्ठता, गॅस, उलट्या इत्यादी पचनसंस्थेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. या वनस्पतीच्या पानाच्या रसामुळे पचनाचे विकार देखील टाळता येतात.
6) निर्गुंडी वनस्पतीची पाने सुकवून त्याची पावडर बनवली व ती विस्तवावर ठेवल्यास डास घरापासून दूर राहतात.
7) निर्गुंडी मध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असते व इतर महत्वाचे पोषक घटक देखील आढळून येतात. यामुळे त्वचेवरील मुरूम तसेच इतर समस्या टाळण्यास मदत मिळू शकते. निर्गुंडीचा रस पिणे यासाठी फायदेशीर ठरते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…