महाराष्ट्र

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज नाही

मोटार वाहन कायदा, 1988 अन्वये मसुदा अधिसूचना जारी

मुंबई: जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर 29 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक (क्लिनर) देण्याची अट शिथिल करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मते सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन निर्मिती होत असल्यामुळे सहाय्यकाची (क्लिनर) शक्यतो गरज पडत नाही. त्यामुळे त्याचा विनाकारण खर्च वाढतो. तो खर्च कमी करण्यासाठी चालकासह सहाय्यक देण्याची अट शिथिल करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 96 (2) (xxxii) अन्वये शासनाला दिलेल्या अधिकारांनुसार या नियमांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, 29 ऑगस्ट 2025 नंतर शासनाकडून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

या मसुद्यावर कोणत्याही व्यक्तीने हरकती किंवा सूचना असल्यास त्या परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, 5 वा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग, क्र. 2, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 येथे पाठवाव्यात. नियोजित तारखेपूर्वी प्राप्त झालेल्या हरकती व सूचना शासनाच्या विचारार्थ घेतल्या जातील.

मसुदा नियम

1 हे नियम महाराष्ट्र मोटार वाहन (प्रथम सुधारणा) नियम, 2025 म्हणून ओळखले जातील.

2) महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 249 मध्ये खालील तरतूद जोडण्यात येईल:

जड मालवाहतूक वाहनामध्ये (Heavy Goods Vehicle) सहाय्यक (attendant) असणे बंधनकारक राहणार नाही, परंतु ही सवलत केवळ अशा वाहनांसाठी लागू राहील जे ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम (Driver Assist System) ने सुसज्ज असतील.

ड्रायव्हर असिस्ट सिस्टीममध्ये 360 अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे थेट दृश्य (live feed) उपलब्ध करून देणारी सुविधा, तसेच ध्वनी आणि दृश्य स्वरूपात इशारे देणारी प्रॉक्सिमिटी अलार्म प्रणाली असणे आवश्यक आहे.

ही प्रणाली वाहन रिव्हर्समध्ये असताना मागून येणाऱ्या वाहनचालकांना व इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना पुरेशी पूर्वसूचना देईल व चालकाला सुरक्षिततेसाठी आवश्यक इशारे देईल.

ही अधिसूचना राज्यातील सर्व वाहनधारक, वाहतूक व्यवसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी 

मा. मंत्री परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

6 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

11 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

12 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

12 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

12 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago