महाराष्ट्र

प्रोफेशनल काँग्रेसमध्ये विविध क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: पल्लवी नायक

अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसचे १५ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान

मुंबई: काँग्रेस पक्षात विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग आधीपासूनच आहे परंतु आता प्रोफेशनल काँग्रेस हे एक स्वतंत्र व्यासपीठ असून डॉक्टर, अभियंते, वकील यांच्याबरोबरच खेळाडू, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. १५ डिसेंबपर्यंत सदस्य नोंदणी करून काँग्रेसबरोबर या, असे आवाहन अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसच्या पल्लवी नायक यांनी केले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पल्लवी नायक म्हणाल्या की, प्रोफेशनल काँग्रेस हे महत्वाचे राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ असून याचे जिल्ह्यापर्यंत सदस्य आहेत. सध्या आयटी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात कामाचा ताण तणाव प्रचंड आहे, नोकरीची शाश्वती नाही तसेच सामाजिक सुरक्षाचे मुद्दाही आहे. आयटी क्षेत्रातील बेभरवशाची नोकरी व कामाचा प्रचंड ताण यामुळे काहीजण आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेत आहेत, हे अत्यंत गंभीर असून या क्षेत्रातील लोकांसाठी प्रोशेनल काँग्रेस हे महत्वाचे व्यासपीठ आहे. आयटी, आरोग्य, फायनान्स, क्रीडा, कलाकार, कृषी, पर्यावरण, आर्किटेक्ट, LGBTQIA, गीग वर्कर यांचा यात समावेश असून त्यांच्या हक्कासाठी आवाज बनून, धोरण ठरवण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे पल्लवी नायक म्हणाल्या.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे, डॉ. निमिष साने व मारिओ पेन्हा यांनीही प्रोफेशनल काँग्रेसबद्दल माहिती दिली. विविध क्षेत्रातील अनेक लोक राजकीय पक्षाबरोबर काम करु इच्छितात पण त्यांच्यासाठी एका व्यासपीठाची गरज असते आणि काँग्रेसने ती उपलब्ध करून दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या महत्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

15 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

15 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

15 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago