महाराष्ट्र

शेवगावात शिवशक्ती आणि जनशक्तीचा संगम, विकासाची नवी ताकद उभी राहणार

जनशक्तीच विजयी होणार, विरोधकांना ‘पेन्शन’ देऊन कायमचे घरी बसवा

अहिल्यानगर: शेवगावमध्ये शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र आल्याने विकासाची नवी शक्ती निर्माण झाली असून या लढाईत जनशक्तीचाच विजय होणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांना कायमची ‘पेन्शन’ देऊन घरी बसवण्यासाठी सज्ज राहा, असे आव्हानही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना वेग येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवगाव आणि उदगीर येथील जाहीर सभांमधून विकासाचा नवा रोडमॅप मांडत जनशक्तीच विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. येथे सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लाडक्या बहिणींसह लाडक्या भावांचा समावेश आहे. शेवगावमध्ये शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र येणे ही केवळ पक्षांतरणाची घटना नसून विकासाच्या दिशेने घेतलेला निर्णायक टप्पा असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, “या लढाईत जनशक्तीच विजय मिळवणार आहे.” विरोधकांना कायमची ‘पेन्शन’ देऊन घरी बसवण्यासाठी सज्ज राहण्याचे आव्हानही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

शेवगावात शिवाजीराव काकडे यांच्या जनशक्ती मंचाचे शिवसेनेत औपचारिक विलिनीकरण जाहीर करत त्यांच्या निर्णयाचे कौतुक करून शिंदे यांनी आगामी शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया मुंढे आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच नेवासा येथे महायुती उमेदवार करणसिंह घुले यांनाही विजयी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५० कोटी रुपयांची मदत आणि जनतेचे प्रेम हीच खरी राजकीय कमाई असल्याचे सांगत त्यांनी शेवगावासाठी रस्ते, उद्याने, शाळा विकास, अतिक्रमितांचे पुनर्वसन, प्रशासकीय इमारत, MIDC आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची घोषणा केली.

दरम्यान, उदगीरमध्ये झालेल्या सभेत शिंदे यांनी शहराच्या विकासाचा ठाम संकल्प करत स्पष्ट संदेश दिला. “उदगीरमध्ये बदल अटळ आहे आणि हा बदल धनुष्यबाणावर बटण दाबूनच होणार आहे.” नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पंचाक्षरी आणि २५ नगरसेवकांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शिंदे म्हणाले की, उदगीरमध्ये उद्योग, रोजगार आणि नागरी सुविधांचा अभाव असल्याने लोक त्रस्त आहेत. हे शहर बदलणार असून त्याचा मार्ग शिवसेनेचा धनुष्यबाण हाच आहे.

“आठ दिवसांनी मिळणाऱ्या पाण्यासाठी ३,००० रुपये आकारला जाणारा कर हा सरळ जनतेवरील अन्याय असून तो संपवला जाईल,” असे आश्वासन देत त्यांनी उदगीरमधील २०० खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. MIDC प्रक्रिया वेगात राबवून रोजगारनिर्मिती, गोरगरीबांना गायरान जमिनीवर हक्क आणि नवीन जिल्ह्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

‘माझी लाडकी बहिण’ योजनेवर टीका होत असली तरी योजना सुरूच राहील आणि दिलेला शब्द मी पाळला आहे आणि पुढेही पाळणार,” असा भावनिक उल्लेख त्यांनी केला. दोन्ही सभांत विविध समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन करत शिंदे म्हणाले, “मुस्लिम समाज, मराठा समाज, लिंगायत, धनगर आणि ओबीसी सर्व समाज एकत्र आल्यास विकास थांबू शकत नाही. जनशक्ती जिंकणार आहे, धनशक्ती नव्हे.” मतदान हा भवितव्याचा निर्णय असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी शेवटी आवाहन केले की,“दोन तारखेला धनुष्यबाणासमोरील बटण दाबा आणि विकासाचा मार्ग निवडा. तुमचे एक मत संपूर्ण भागाचा कायापालट करू शकते.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

12 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

12 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago