मुंबई: चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात दिनांक १३मे रोजी मुंबई महानगर पालिकेच्या महिला स्वयंरोजगार योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात आसपासच्या परिसरातील महिला उपस्थित राहणार होत्या.
मा मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि मा उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळणार हे गृहित होत. मात्र सरकारने मध्यंतरी जी आर केला की, दुपारी १ ते ४या वेळेत उन्हाचा तडाखा जास्त असतो म्हणून कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम उघड्या मैदानात या वेळेत घेऊ नयेत.
या कार्यक्रमासाठी महिला दुपारी दीड दोन वाजल्यापासून तिथे आल्या होत्या आणि त्या मुख्यमंत्री येण्याच्या दरम्यानच संध्याकाळी कंटाळून निघाल्याने याचे चित्रण काही पत्रकार करत होते! टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधीना स्थानिक आमदार कार्यकर्त्यांनी धक्काबुकी करून,त्याचा कॅमेरा खेचून रेकॉर्डिंग चिप काढून घेतली व दोधाना मारहाण केली सोबतचा स्ट्रीजर घाबरून पळला.
काही वेळात तिथे पोलीस आल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. चॅनलच्या प्रतिनिधींना मारण्याचे कारण काय आणि मुळात दुपारपासून महिलांना तिष्ठत का ठेवले? कंटाळून निघालेल्या महिलांचा दोष नव्हता आणि ते चित्रीकरण करणे हा त्या पत्रकारांचा दोष नव्हता. त्या पत्रकाराला मारहाण करणे हे समाजविघातक कृत्य आणि म्हणून या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच ज्या चॅनलचे ते प्रतिनिधी आहेत त्या चॅनेलनी साधी बातमी ही आपल्या चॅनलवर दाखवली नाही आणि निषेधही व्यक्त केला नाही. ह्याचच आश्चर्य आहे जर त्या पत्रकाराने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली तर वृत्तवाहिनी त्याला किती आणि कशी मदत करेल ही शंका आहे आणि अशा प्रकारात त्या बिचा-या पीड़िताला आपली नोकरी टिकवणे अत्यावश्यक असते!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनहितार्थ काम करण्यासाठी मैदानात उतरले आहेत मात्र त्यांचे मुजोर कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे जर आपला राग पत्रकारांवर काढण्यासाठी हात उचलत असतील तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार करावी, अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यानी ट्विटर द्वारे आणि इतर समाजा माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. तसेच आपल्या प्रतिनिधीची कामाच्या वेळी जबाबदारी घेण्याचे भान माध्यम व्यवस्थापनाला जास्त असलीच पाहिजे ही चर्चा या निमित्ताने ऐरणीवर आली आहे.
मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…
‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…