मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी केले.
राज्याच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन २०२६’ निमित्त शासकीय विधी महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी सचिन अहिर यांच्या हस्ते ‘अर्थशास्त्र परिभाषा कोष’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि ती समृद्ध करण्यासाठी योगदान देणाऱ्या वाचक प्रेरकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपत तिचा ज्ञानभाषा म्हणून विकास करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद असल्याचे अहिर यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी कामगार चळवळीतील आठवणींनाही उजाळा दिला. राष्ट्रीय मजदूर मिल संघाचे संस्थापक डॉ. ग. द. आंबेकर यांनी कामगारांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ग्रंथालयाची स्थापना केली होती. त्यातून सुरू झालेली वाचन संस्कृतीची परंपरा आजही कायम असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ग्रंथालयांची देखभाल आणि ग्रंथांचे संरक्षण करण्यासाठी मिळणारे अनुदान अपुरे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, भाषा संचालक डॉ. अरुण गीते, शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, समीक्षक डॉ. नितीन रिंढे, डॉ. विजय ककडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. राहुल गांगुर्डे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…