मुंबई: राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील यासाठी लवकरच प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून मागण्या जाणून घेतल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण प्रांताधिकारी, गोविंद शिंदे तहसिलदार, कुंदन हिरे, अमोल निकम आदी उपस्थित होते.
तालुकास्तरावरील नायब तहसिलदार हे अतिशय महत्त्वपूर्ण व जबाबदारीचे राजपत्रित वर्ग २ चे पद आहे. त्यामुळे नायब तहसिलदारांच्या मागण्याबाबत शासन लवकरच प्रशासनाशी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…