मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री, भ्रामक जाहिराती आणि एनडीपीएस औषधांच्या गैरवापराविरोधात मोठी मोहीम राबवत 88 धडक कारवाया केल्या. या कारवाईत सुमारे 9.50 कोटी रुपयांचा बेकायदेशीर औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच 20 गुन्हे दाखल करून 10 आरोपींना अटक करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्या तीन रक्तपेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
एफडीएने औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, वैद्यकीय उपकरण नियम, एनडीपीएस कायदा आणि औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियमांतर्गत ही राज्यव्यापी कारवाई केली. भ्रामक आणि अवास्तव दावे करणाऱ्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या जाहिरातींवर विशेष लक्ष केंद्रित करत 31 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 55.57 लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली.
नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, अकोला, सातारा, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे विनापरवाना औषध उत्पादन व विक्रीविरोधात 27 कारवाया करण्यात आल्या.
सौंदर्यप्रसाधनांवरही कारवाई
मुंबई आणि भिवंडीतील विनापरवाना सौंदर्यप्रसाधन उत्पादन केंद्रांवर धाड टाकून बॅच क्रमांक, उत्पादन व मुदत समाप्ती दिनांक नसलेली तसेच खोट्या पत्त्यावर उत्पादित असल्याचे दर्शविणारी उत्पादने जप्त करण्यात आली. एका बेकायदेशीर क्रीम उत्पादन कारखान्यालाही टाळे ठोकण्यात आले.
पाकिस्तानी क्रीम जप्त
मोगलपुरा परिसरातील एका कॉस्मेटिक दुकानातून प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी शाहीद रियाज शेख (36) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 12 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रक्तपेढ्यांसाठी कडक नियम
राज्यातील विविध रक्तपेढ्यांतील गैरप्रकारांची गंभीर दखल घेत एफडीएने नव्या रक्तधोरणांतर्गत सर्व रक्तपेढ्यांसाठी कडक निर्देश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रक्तदान शिबिर आयोजकांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करण्यात येणार असून रक्तसंकलन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाणार आहे.
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…
भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका…