महाराष्ट्र

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ‘तो’ एक शब्द वापरला अन्

मुंबई: उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी 25 मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली. बाळासाहेबांच्या खोलीत जात त्यांच्या आसनाला अभिवादन केले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी वापरलेल्या एका शब्दामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते धास्तावले आहेत

राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या…’

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवसेना पक्षप्रमुख’ हा शब्द वापरल्याने एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेते आक्षेप घेतला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘राज ठाकरे यांना माहिती आहे की दोन शिवसेना आहेत. शिवसेना युटीबी आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह माननीय कोर्टाने एकनाथजी शिंदे यांना दिलेलं आहे.’

‘राज ठाकरे शुभेच्छा द्यायला गेले पण नंतर विषय चालू होतात. खरं महाराष्ट्रात खूप काही गोष्टी बोलण्या सारख्या करण्या सारख्या गोष्टी आहेत. बऱ्याच समस्या आहेत परंतु दोन भाऊ एकत्र आले तर कुठली मोठी राष्ट्रीय समस्या सुटली आणि ती संपुष्टात आली. किती लोकांना यामध्ये रस असले. पाच जुलैला लोकांनी पाहिला सोहळा. आता पुन्हा पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणून त्यात चर्चा करण्यासारखे काही नाही. महायुती भक्काम आहे.’, असे देखील मनिषा कायंदे यांनी सांगितले.

राज यांच्याकडून शिंदेंची कोंडी

राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख करत एकनाथ शिंदेंची कोंडी केल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे. तर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे आहे आणि चिन्ह मशाल आहे. तरी सुद्धा राज यांनी शिवसेना प्रमुख असा उल्लेख करत खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची असल्याचे सुचित केल्याचे मानले जात आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंची युती झाली तरी खऱ्या शिवसेनेच्या मुद्यावर राज ठाकरे एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याची देखील शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

22 मिनिटे ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

1 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

1 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

1 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

1 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

4 तास ago