क्राईम

24 तासात एकाच घरातील चार जणांचा मृत्यू…

बारामती: बारामतीच्या रस्त्यावरील भयानक वेगाने काल एका निष्पाप कुटुंबातील तिघाजणांचे बळी घेतल्यानंतर ओंकार आचार्यच्या वडिलांचेही आज पहाटे निधन झाले. राजेंद्र श्रीनिवास आचार्य हे निवृत्त शिक्षक होते.

काल बारामतीच नाही, तर संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणारी घटना बारामतीत घडली. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेले आचार्य कुटुंब संपले. काल दिवसभर बारामती सुन्न होती. संध्याकाळच्या साडेसात वाजता च्या वेळी ओंकार आणि त्यांच्या दोन्ही मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आज पहाटे ओंकार चे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र आचार्य हे आजारी होते. बारामतीतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना अपघाताच्या घटनेच्या आधी म्हणजे शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांची प्रकृती तशी नाजूक होती, मात्र कालच्या घटनेने प्रचंड धक्का बसलेल्या राजेंद्र आचार्य यांनी आज शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांनीदेखील इहलोकीची यात्रा संपवली.

हा विकासाच्या भयावह वेगाला आणि कलियुगातल्या दशरथाला शाप..

काल ओंकार आणि त्याची मुलगी सई व माधुरी यांचा बळी घेणारा हायवा डंपरच्या चालक दशरथ होता. पुराणकाळात देखील दशरथाला श्रावणबाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता. सध्याही हिंदुत्वाचे युग आहे. प्रत्येकाच्या तोंडी रामायण महाभारत आहे.. काल देखील बारामतीत कलियुगाच्या दशरथाने आपल्या श्रावणबाळाचे प्राण घेतले हा विरह सहन न झाल्याने त्या बापाने देखील प्राण सोडला.

बारामतीतच नव्हे तर राज्यात विकास भयावह वेगाने वाहतो आहे. दीडविताच्या पोटासाठी भाकरीचा चंद्र शोधताना प्रत्येक जण जीवाच्या आकांताने धावपळ करतो आहे आणि तोच वेग दुसऱ्याचा जीव घेतो आहे. निष्काळजीपणा दुसऱ्याच्या जीवावर बेततो हे माहीत असूनही बारामतीत अनेक घटना घडूनही हायवा डंपरच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. फक्त हप्त्यावरच सगळे भागणार आहे का? जे कोणी हे पाप करते आहे, त्यांची ही मुले रस्त्यावर फिरत असणारच ना? थोडी सद्सद्विवेकबुद्धी शिल्लक असेल, तर प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी यावर काहीतरी उपाय काढायला हवा. नाहीतर सातत्याने अशा घटना घडत राहतील.. गरिबांच्या घरातील मुले मरतील आणि त्या त्यावेळी फक्त निषेधाचे दोन सूर ऐकायला मिळतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

7 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

7 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

7 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

22 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago