महाराष्ट्र

देशी-विदेशी दारू महागल्याने विक्री घटली

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात विदेशी दारूची विक्री ८ लाख १३ हजार १८४ लिटर दारूची विक्री झाली होती. २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात मात्र ५ लाख ७४ हजार १ लिटर विदेशी दारूची विक्री झाली.

म्हणजेच २ लाख ३९ हजार १८३ लिटर कमी दारूची विक्री झाली. हे विक्री घटण्याचे प्रमाण तब्बल २९.४१ टक्के आहे. देशी दारू, वाईन आणि बिअरचीही विक्री घटली असून दुसरीकडे महसूल उद्दिष्ट ५९० कोटींचे असल्याने हे गणित कसे साधायचे, याची चिंता अधिकाऱ्यांना लागली आहे.

राज्य शासनाने देशी-विदेशी दारूचे दर वाढविले आहेत. १८० मिलिलिटर (एमएल) देशी दारूची बाटली ८० तर भारतीय बनावटीची विदेशी दारू अडीचशेवरून ३६० रुपयांना झाली आहे. याशिवाय हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये विदेशी दारू विक्रीवर १५ ते २० टक्क्यांचा अतिरिक्त शुल्क आकारला आहे. त्यामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यात जुलैमध्ये १३ हजार ७३४ लिटर तर जुलै-ऑगस्टमध्ये तीन लाख ६६ हजार लिटरने विदेशी दारूची विक्री कमी झाल्याची बाब समोर आली आहे. दरवर्षी सोलापूर शहर-जिल्ह्यात सुमारे ३५० ते ४५० कोटींची दारू विक्री होते. त्यात दिवसेंदिवस वाढ होते, अशीच स्थिती दरवर्षी पाहायला मिळाली.

पण, राज्य सरकारने देशी व विदेशी दारूचे दर वाढविले आणि विक्रीवरील अतिरिक्त शुल्कातही वाढ केली. त्यामुळे १८० मिलिलिटर देशी-विदेशी दारूच्या बाटलीचे दर ८० ते १६० रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे मद्यपींनी पिण्याचे प्रमाण कमी केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी वाढवून दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही, याची चिंता अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयांना असेच महसुलाचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे.

देशी-विदेशी दारूची विक्री (‘एमएल’मध्ये)

१) देशी दारू विक्री

(२०२४-२५) : ३८,४९,३७८ लिटर

(२०२५-२६) : ३९,६१,९८१ लिटर

विक्रीतील फरक : १,१२,६०३ लिटर

जुलै महिन्यात १३,७३४ लिटरने देशी दारूची विक्री कमी झाली

२) विदेशी दारू विक्री

(२०२४-२५) : ४२,४१,३७४ लिटर

(२०२५-२६) : ४२,६५,५३६ लिटर

विक्रीतील फरक : २४,१६२ लिटर

जुलै महिन्यात ६७ हजार ६९८ लिटर तर ऑगस्टमध्ये दोन लाख ३९ हजार १८३ लिटरने विदेशी दारूची विक्री कमी झाली

३) बिअर विक्री

(२०२४-२५) : ३४,४८,०९८ लिटर

(२०२५-२६) : ३६,९४,६०१ लिटर

विक्रीतील फरक : २,४६,५०३ लिटर

जून महिन्यात ११ हजार १८२ लिटरने बिअरची विक्री कमी झाली

४) वाईन विक्री

(२०२४-२५) : ५०,४३३ लिटर

(२०२५-२६) : ६३,९५० लिटर

विक्रीतील फरक : १३,५१७ लिटर

मे महिन्यात ९३४ लिटरने वाईनची विक्री कमी झाली

दारूचा खप कमी, तरी महसुलाचे उद्दिष्ट दुप्पट

शासकीय योजनांवरील खर्चाची भागवाभागव करताना शासनाने आरटीओ (परिवहन विभाग), खरेदी-विक्री कार्यालये (मुद्रांक शुल्क विभाग) व राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसुलाचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे. सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला गतवर्षी २६० कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट होते, त्या वर्षी दारूचे दर स्थिर असल्याने विभागाने तब्बल ३८५ कोटींचा महसूल शासनाला दिला. यंदा मात्र दारूचे दर वाढल्याने खप कमी झालेला असताना देखील ५९० कोटींच्या महसुलाचे टार्गेट दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago