मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाला अखेर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून मिळाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच शिवसेना UBT आणि मनसे यांच्यातील संभाव्य सहकार्यामुळे हा मेळावा अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे करतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिवसेना UBT ने मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता. त्यावर महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद देत परवानगी देण्यात आली आहे. या मे,ळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी या मेळाव्याबाबत ‘न भूतो न भविष्यति’ असे विधान करत त्याची भव्यता अधोरेखित केली.
शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार?
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आपल्या दसरा मेळाव्यासाठी पर्यायी ठिकाणांच्या शोधात आहे. वरळी डोम आणि आझाद मैदान या दोन्ही ठिकाणांचा विचार करण्यात आला होता. मात्र वरळी डोममध्ये जागा अपुरी पडेल, म्हणून आझाद मैदानालाच पसंती दिली गेली आहे. यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू असून, लवकरच मेळाव्यासाठी आझाद मैदानावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत आहेत.
मनसेची निवडणूक आयोगाला भेट
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू केल्या आहेत. अद्ययावत मतदार याद्या लवकर प्रसिद्ध कराव्यात, या मागणीसाठी मनसेचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली.
राज ठाकरे यांची बैठक आणि सूचना
मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शिवतीर्थ निवासस्थानी आयोजित केली. या वेळी बीएलओसह इतर नेमणुका त्वरित जाहीर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…